संजीवराजे निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम केले म्हणून ईडीची धाड पडली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच स्वायत्त यंत्रणांनी तरी अण्णा हजारे यांच्यासारखे वागू नये असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, एकीकडे ज्यांनी घोटाळे केले त्यांच्याविरोधात सर्व पुरावे स्वतः सत्ताधारी आमदार, सामाजिक कार्यकर्ते देत असताना
ईडी, आयटी विभागाला जाग येत नाही, परंतु दुसरीकडे संजीवराजे निंबाळकर यांनी विधानसभेला, लोकसभेला राष्ट्रवादीचे काम केले म्हणून त्यांच्यावर छापेमारी होते याला काय म्हणावे? किमान स्वायत्त यंत्रणांनी तरी मा. अण्णा हजारे यांच्यासारखे वागू नये असे रोहित पवार म्हणाले.
एकीकडे ज्यांनी घोटाळे केले त्यांच्याविरोधात सर्व पुरावे स्वतः सत्ताधारी आमदार, सामाजिक कार्यकर्ते देत असताना #ED, #IT विभागाला जाग येत नाही, परंतु दुसरीकडे संजीवराजे निंबाळकर यांनी विधानसभेला, लोकसभेला राष्ट्रवादीचे काम केले म्हणून त्यांच्यावर छापेमारी होते याला काय म्हणावे?…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 5, 2025