जागेच्या वादातून महिलांना दांडक्याने बेदम मारहाण

जागेच्या वादातून एका माथेफिरूने चार महिलांना बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मनोज मोरे असे मारहाण करणाऱ्या माथेफिरूचे नाव असून त्याने महिलांच्या सडवली गावातील जागेत बेकायदेशीर बांधकाम केले आहे. रविवारी तक्रारदार महिला अनिशा गायकवाड या त्यांच्या भावकीतील तीन महिलांसोबत जागेत उभारलेले बांधकाम तोडण्यासाठी आल्या. त्या वेळी मोरेने महिलांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.