Rahul Dravid च्या कारला रिक्षाची धडक, दोघांमध्ये वाद; व्हिडिओ व्हायरल

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक आणि उत्तम फलंदाज राहुल द्रविड हा एका घटनेमुळे चर्चेचा आला आहे. बंगळुरूच्या रस्त्यावर एक रिक्षा चालकासोबत वाद घालताना त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राहुल द्रविडच्या कारला रिक्षाची धडक बसली. यामुळे त्यांच्यात वाद झाला असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड याच्या कारची व एका लोडिंग ऑटो रिक्षाची धडक झाली. ही घटना मंगळवारी कनिंगहम रोड बंगळुरूमध्ये घडली आहे. अपघातानंतर राहुल द्रविड आणि लोडिंग करणाऱ्या रिक्षाचालक यांच्यातील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. लोडिंग ऑटो धडकल्यामुळे राहुल द्रविडच्या कारचं थोड नुकसान झाल्याने राहुल द्रविड रिक्षा चालकावर संतापला. द्रविड कन्नडमध्ये ड्रायव्हरशी वाद घातलाना व्हिडिओत दिसतोय. मात्र, सुदैवाने या रिक्षा आणि कारच्या धडकेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.