मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंगं पुरलीत, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे, असा निशाणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी साधला.
‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत गेले नाहीत. मुख्यमंत्री तेथे का गेले नाहीत, ते का अस्वस्थ आहेत? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. मुख्यमंत्रीपद दुसऱ्या कुणाकडे टिकू नये म्हणून ‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंगं पुरली आहेत, अशी चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील लिंबूसम्राटांनी याबाबत उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.