धारावी-चेंबूर विधानसभा क्षेत्रात खेळ महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद

खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मध्य मुंबईत आयोजित खेळ महोत्सवादरम्यान धारावी-चेंबूर विधानसभा क्षेत्रात स्पर्धकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.  नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित खेळ महोत्सव यशस्वी ठरला आहे.

गेले तीन आठवडे सुरु असलेल्या महोत्सवादरम्यान चेंबूर विधानसभा क्षेत्रात मुंबई पब्लिक स्कूलजवळ आशीष तलावात आयोजित विविध खेळांच्या स्पर्धांना मोठय़ा संख्येने स्पर्धकांचा सहभाग लाभला. खेळाडूंसह त्यांच्या पालकांनीही या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद दिला. धारावी विधानसभा क्षेत्रातही जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासन  स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील चुरस आणि खेळाडूंची मेहनत पाहून उपस्थित प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने दाद दिली.

या महोत्सवाला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, पद्मावती शिंदे,  दिनेश बोभाटे, महेंद्र नाकटे, रुक्मिणी भोसले, नीलम डोळस, निधी शिंदे, स्मिता गावकर, रेणुका टोपकर, अरुण हुले, राजेंद्र पोळ, अविनाश शेवाळे, गणेश पाटील, सचिन भोसले, राजेश दौंडकर, किरण म्हात्रे, राकेश बनसोडे, विकास भोसले,  दुर्गा ढगे, रूपेश मढवी, क्रीडा संघटक महेंद्र चेंबूरकर आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार बाबूराव माने यांच्यासह विठ्ठल पवार,  महादेव शिंदे, प्रकाश आचरेकर, वसंत नकाते, सतीश तटे, आनंद भोसले, नुतू पटन, बाबा सोनवणे, भास्कर पिल्ले, सुरेश सावंत यांच्यासह अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.