
सायबर फ्रॉडसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला असून डीपफेक व्हिडीओद्वारे बनावट गुंतवणूक योजनांना प्रमोट केले जात आहे. या व्हिडिओपासून ग्राहकांनी सावध राहावे, सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यावर तात्काळ विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. जास्त आणि अवाजवी रिटर्न देणाऱ्या कोणत्याही योजनेसंबंधी बँक किंवा अधिकाऱ्यांचे देणेघेणे नाही. गुंतवणूक करण्याआधी ग्राहकांनी पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.