केरळमधील एका अंगणवाडीतील चिमुकल्याने उपम्याऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्रायची मागणी केली आहे. त्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बालसंगोपन केंद्राने त्याची दखल घेतली आहे. यावर लवकरच केरळ सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सध्या सोशल मीडियावर थरनूल एस शंकर नावाच्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्या चिमुकल्याचे आई त्याला शंकु म्हणतेय. शंकु आपल्या आईला सांगतोय, अंगणवाडीत उपम्याऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्राय द्यायला पाहिजे. शिवाय व्हिडीओ रेकॉर्ड करताना ती त्याला घरी बनवलेली बिर्याणी खाऊ घालताना दिसत आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ त्याच्या आईने शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
केरळच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. ज्यामध्ये तो मुलगा त्याचे आवडते पदार्थ मागत आहे. यावरून आता अंगणवाडीच्या मेनूमध्ये बदलाची चर्चा आहे.वीणा जॉर्ज म्हणाल्या की, शंकूने अतिशय निरागसपणे ही मागणी मांडली आहे. आणि विचार केल्यानंतर अंगणवाडीच्या जेवणाच्या मेनूमध्ये सुधारणा करण्याचा विचार केला जात आहे. मुलांना पोषण मिळावे यासाठी अंगणवाड्यांमार्फत विविध प्रकारचे अन्न पुरवले जात आहे.
View this post on Instagram
सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून आम्ही मुलांना अंडी आणि दूध देत आहोत. ते यशस्वीरित्या चालू आहे. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटले आहे.