खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केला पीक विमा घोटाळा, केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?

राज्यात 500 कोटी रुपयांचा पीक घोटाळा झाल्याची कबुली राज्याच्या कृषीमंत्र्यांनी दिली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत दिली. यावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात 500 कोटी रुपयांचा पीक घोटाळा झाल्याची कबुली राज्याच्या कृषीमंत्र्यांनी दिली. त्यानंतर भाजपचेच आमदार सुरेश धस म्हणाले की तो फक्त 500 नाही तर पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. गेली अडीच वर्ष आणि आताही राज्यात भाजपचं सरकार आहे तर केंद्रीय कृषीमंत्री याची चौकशी करणार का?

कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ही बाब मला सुप्रिया सुळे यांच्याकडूनच कळाली, आधी 500 कोटी तर कधी 5 हजार कोटी, अशा जुमल्यातून गोष्टी नाही चालत. पण संसदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर कुठे घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी होईल आणि आरोपींवर कडक कारवाई होणार.