मुंबई आणि हरयाणा या संघांमध्ये 8 फेब्रुवारी पासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपद अजिंक्य राहणे करणार असून टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली आहे.
मुंबईच्या संघाने मेघालयचा 456 धावांनी पराभव कारत उंपात्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. तोच दरारा कायम ठेवत हरयाणाला धुळ चारण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरेल. संघात सूर्यकुमार यादव आणि फॉर्मात असलेल्या शिवम दुबे यांची निवड करण्यात आल्यामुळे दोघांकडूनही संघाला आणि चाहत्यांना जास्त अपेक्षा आहेत. यंदाच्या सत्रात दोन्ही खेळाडूंनी मुंबईकडून एक-एक सामना खेळला आहे. त्याचबरोबर संघात हर्ष तन्ना या नवख्या खेळाडूचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
उंपात्यपूर्व सामन्यासाठी मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवन दुबे, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघा भटकळ, सिद्धेश लाड, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.