चालकाची डुलकी जीवावर बेतली, डीजे वाहनाच्या अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी

चालकाला डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डीजे वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हे डीजे वाहन अमरावतीहून भंडाऱ्याच्या दिशेने चालले होते. यादरम्यान नागपूरच्या रामटेक जवळ ही घटना घडली. मयूर मेश्राम असे मयत तरुणाचे नाव आहे. तर तुषार मेश्राम, निकेश ठक्कर आणि ईश्वर भेलावे अशी जखमींची नावे आहेत.

अमरावती येथील कार्यक्रम आटोपून सर्वजण भंडाऱ्याला घरी परतत होते. यावेळी चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.