Mahakumbh 2025 चेंगराचेंगरी काही मोठी घटना नाही, प्रकरण उगाच ताणलं जात आहे; हेमा मालिनी यांचे असंवेदनशील वक्तव्य

महाकुंभात मौनी अमावस्येच्या पहाटे झालेल्या चेंगराचेंगरी 30 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या काही तासानंतरच भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संगमावर जाऊन अमृतस्नान केले. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. ते प्रकरण ताजे असतानाच हेमा मालिनी यांनी महाकुंभ येथे घडलेली चेंगराचेंगरी ही मोठी घटना नसून उगाचच या घटनेला ताणले जात आहे, असे वक्तव्य केलं आहे.

विरोधात बोलणं हे विरोधकांचे काम आहे. आम्ही कुंभला गेलेलो, सर्व काही व्यवस्थित होतं. ही घटना घडली आहे हे मान्य आहे पण एवढं मोठं काही झालेलं नाही. उगाचच प्रकरण ताणले जात आहे, असे हेमा मालिनी म्हणाल्या. एएनआयशी बोलताना हेमा मालिनी यांनी हे वक्तव्य केलं आहे.