जशास तसे! चीनचाही अमेरिकेला दणका; अमेरिकी उत्पादनांवर टेरिफ वाढवणार

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य केलेल्या अवेध रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवरील उत्पादनांवर अतिरिक्त टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये टेरिफ वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे. दोन्ही देशात अनेक मुद्द्यांबाबत वाद असून टेरिफमुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय पुढील महिन्याभरासाठी स्थगित केला आहे. मात्र, चीनला यातून दिलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देत अमेरिकी उत्पादनांवरील टेरिफ वाढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने टेरिफ वाढ केल्यास कॅनडादेखील त्यांच्या उत्पादनांवर टेरिफ वाढवेल, असे कॅनडाकडून सांगण्यात आले होते. आता चीनच्या भूमिकेमुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी फटका बसला आहे. टेरिफ लावल्याने अमेरिकेत महागाई वाढू शकते हे ट्रम्प यांनी मान्य केले असले तरी अवैध प्रवासी वाहतूक, ड्रग्स वाहतूक आणि देशातंर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी हे गरजेचे असल्याचं ट्रम्प यांनी म्हटले आहे. सांगितले.

आता चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनावर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेलाही त्याचा फटका बसणार आहे. चीनकडून अमेरिकन उत्पादनावर शुल्क आकारण्यात येणार आहे. चीनमध्ये अमेरिकन उत्पादनावर यापुढे 10 ते 15 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय झाला आहे. कोळसा, एलएनजीवर 15 टक्के टेरिफ लावले आहे. तर कृषी उपकरणे, पिकअप ट्रॅक, वाहने यावर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच चीनकडून गूगलवरही कठोर निर्बंध लादण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.