बाॅलिवूड अभिनेता अर्जून रामपाल नुकत्याच एका कार्यक्रमात स्टंट करताना जखमी झाला. नेटफ्लिक्सच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. अर्जुन रामपालचा सोशल मीडीयावर यासंदर्भातील व्हिडीओ सध्याच्या घडीला व्हायरल होताना दिसत आहे.
अर्जुन रामपाल याने कार्यक्रमाच्यावेळी काच तोडून त्याने एन्ट्री घेतली, परंतु हा स्टंट करताना तो चांगलाच जखमी झाला. नेटफ्लिक्सच्या आगामी शो ‘राणा नायडू’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनसाठी अर्जुन आला होता त्यावेळी ही घटना घडली. यावेळी अर्जुन एका पातळ काचेच्या भिंतीमागे उभा होता आणि त्याने लाथा आणि ठोसे मारून काच फोडली. परंतु यावेळी ती काच फोडून तो बाहेर येत असतानाच काच त्याच्या डोक्यावर पडली. काच डोक्यावर पडल्यानंतर सुदैवाने अर्जुनच्या डोक्याला इजा झाली नाही, मात्र अर्जुनच्या हाताला मात्र जबर मार लागल्याचे निदर्शनास आले. अर्जुनच्या हातावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याचे तसेच बोटातून रक्त वाहत असल्याचे यावेळी दिसून आले.
अर्जुन रामपालचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, या घटनेवर नेटकरी सुद्धा चांगल्याच मजेशीर कमेंट देऊ लागले आहेत. अर्जुन रामपालचा ‘राणा नायडू सीझन २’ नेटफ्लिक्सवर येत्या काही दिवसांमध्ये प्रसारित होईल. या शोमध्ये राणा दुगाबत्ती आणि वेंकटेश या दोघांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहे.