आदिवासी समाजातील भाजप खासदारांनी काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा सोनिया यांच्यावर आरोप आहे. भाजप खासदारांनी राज्यसभा सभापती धनखड यांची भेट घेऊन सोनिया यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. मुर्मू यांची भाषण करताना दमछाक झाली.फारच वाईट, अशी टिपण्णी सोनिया गांधी यांनी केली होती.