मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिकेने यंदा म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74 हजार 427 कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला आहे. जुन्या योजना, उपक्रम तरीही वर्षभरात 14 हजार कोटींची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनाते अर्थसंकल्पात यांदा 14.19 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने 2024-25 साठी 65,180 कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. 24-25 या गेल्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेला 31 मार्च 2025 पर्यंत 40,693 कोटींच्या महसुली उत्पन्नाची आपेक्ष आहे. डिसेंबर 2024 पर्यंत महापालिकेने 28,308 कोटींचे महसुली उत्पन्न मिळवले आहे.
मिंधे-भाजपच्या सत्ताकाळात गेल्या आर्थिक वर्षात 12 हजार कोटींच्या ठेवी मोडल्या होत्या. आता नव्या आर्थिक वर्षात पुन्हा 16 हजार 699.78 कोटींच्या ठेवी अंतर्गत निधीमधून म्हणजेच ठेवीतून उचलणार आहे. शिवसेनेच्या सत्ताकाळात 92 हजार कोटींवर गेलेल्या एफडी ऑलरेडी 82 हजार कोटींवर आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात आज सादर करण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज ‘ई’ हे महानगरपालिकेचे प्रशासक तथा शिक्षण समितीचे प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केले. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज ‘अ’, ‘ब’ आणि ‘ग’ हे महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केले.
मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच सादर करणार बजेट
मुंबई महापालिकेने 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात शिक्षण विभागाचा 3955 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी या अर्थसंकल्पात 458 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.