Photo – विराट कोहलीचे इंदूरमधील नवीन रेस्टाॅरंट One8 Commune ची झलक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या यादीत 19 व्या स्थानावर आहे. 132 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट एका पोस्टसाठी 6,80,000 डॉलर (5 कोटी 8 लाख) घेतो.

हिंदुस्थानातील स्वच्छ शहर म्हणून इंदूरची ओळख सर्वांनाच ज्ञात आहे. तसेच इंदोरची दुसरी हवीहवीशी वाटणारी ओळख म्हणजे इथला सराफा बाजार. सराफा बाजार खाऊगल्ली हे खवय्यांचे हक्काचे ठिकाण. खवय्यांच्या याच नगरीत आता क्रिकेटपटू विराट कोहलीचे ONE8 COMMUNE हे रेस्टाॅरंट दाखल झाले आहे. हाय स्ट्रीट अपोलोमध्ये स्थित असलेले हे रेस्टाॅरंट म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच आहे.

वन 8 कम्यूनच्या मेन्यूची खासियत म्हणजे इथे अनेक देसी पदार्थांना ग्लोबल टच देण्यात आलेला आहे. इंदूरच्या आवडत्या स्ट्रीट फूडला जलेबी चाट, काला चना हम्मुस चाट आणि दाल पकवान सारख्या पदार्थांना ग्लोबल टच देण्यात आलेले आहे. मेनूमध्ये डिमसम, सुशी आणि इतर अनेक जागतिक पदार्थांचा देखील समावेश आहे.

इंदूरसारख्या शहरामध्ये भटकंती करताना सराफा बाजाराच्या जोडीला आता विराट कोहलीचे वन 8 कम्यून पण खवय्यांची भूक भागवेल यात शंकाच नाही.