शिळफाटा रोड येथील टाटा पॉवरसमोरील नवीन कल्याण रोड परिसरात चक्क मेंढ्यांची झुंज लावण्यात आली. अशा प्रकारची झुंज लावायला बंदी असतानाही दोन मेढ्यांमध्ये सामना घडवून आणणाऱ्या 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 10 जांना कल्याण गुन्हे शाखेने ताव्यात घेतले असून फरार झालेल्या 20 जणांचा शोध पोलीस घेत आहेत.
टाटा पॉवर परिसरात मेंढ्यांची झुंज सुरू असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार विजेंद्र नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. या छाप्यात नासिर नारू, असलम नारू, सईद अली हाश्मी, अतीक शेख, अझर बुकवाला, नवीन अठानी, फैजल खान, वशीम शहा, इमरान मोटरवाला, सरफराज शेख, चलीद जत या 10 जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या झुंजीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.आपला मेंढा जिंकावा म्हणून मालकांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवले.
उच्चशिक्षितांचा सहभाग
या झुंजीसाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर पुण्यातील कोंढवा, जोगेश्वरी, मालाड, वडाळा, अंधेरी या ठिकाणांहून उच्चशिक्षित तरुण, व्यावसायिक आणि नोकरदार डोंबिवलीत दाखल झाले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये उच्चशिक्षित अभियंता, माशांची शेती करणारा व्यावसायिक, कापड दुकानदार आणि एका विमान कंपनीतील सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.