Sanjay Raut मंत्रीपद कुणाकडे टिकू नये म्हणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यावर पुरल्याची चर्चा – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे अद्याप वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) राहायला गेलेले नाहीत. वर्षा बंगल्यात कुणीतरी काळी जादू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

”भाजपच्या आतल्या गोटात चर्चा आहे की वर्षा बंगल्यावर बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवीच्या मंदिरात जे रेडे कापले त्यांची मंतरलेली शिंगं पुरलेली आहेत. तिथला स्टाफ देखील हे सांगत आहे. मुख्यमंत्रीपद कुणाकडेच टिकू नये म्हणून ही मंतरलेली शिंग तिथे पुरण्यात आली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

”मुख्यमंत्री निवासस्थान हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. ते रिकाम राहतंय. नक्की तिथे काय घडलंय, कुणामुळे झालंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भिती आहे, हे महाराष्ट्राला समजायला हवे, असंही संजय राऊत म्हणाले.