कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसमध्ये प्रेस सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. कॅरोलिन या अवघ्या 27 वर्षांच्या असून त्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण सेक्रेटरी ठरल्या आहेत. 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर कॅरोलिन यांनी 28 जानेवारीला नव्या प्रशासनांतर्गत आपली पहिली पत्रकार परिषद घेत ट्रम्प प्रशासनाची ब्रीफिंग दिली. कॅरोलिन यांचे पती निकोलस रिचियो (59) असून ते कॅरोलिन यांच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठे आहेत. कॅरोलिन या सोशल मीडियावर फारशा ऑक्टिव नाहीत. सोशल मीडियावर ऑक्टिव्ह राहायला आवडत नाही, असेही कॅरोलिन यांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने कॅरोलिन यांच्यावर कमी वयात इतकी मोठी जबाबदारी टाकल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.