इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने शिकाऊ पदांच्या 456 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार कमीतकमी बारावी उत्तीर्ण, दोन वर्षांचा आयटीआय किंवा तीन वर्षांचा डिप्लोमाधारक असावा. अन्य उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाहीत. या भरतीमध्ये तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांचा समावेश आहे. संबंधित भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट iocl.com/appreticeships वर देण्यात आली आहे. उमेदवारांचे वय किमान 18 ते 24 वर्षे असायला हवे.