उदित नारायण यांच्या ‘पप्पी’ची चर्चा लव करावं वाटतंय गं आता म्हातारपणात!

बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक उदित नारायण यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात तीन ते चार महिलांची पप्पी घेतल्याचा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. हा प्रकार उघडकीस आल्यापासून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेबद्दल उदित नारायण यांनी स्पष्टीकरण देत घटनेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, सोशल मीडियावर अजूनही या घटनेची चर्चा थांबायचं नाव घेत नाही. उदित नारायण यांचे वय सध्या 69 वर्षे आहे. या वयात त्यांनी असे करायला नको होते, असे त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करून म्हटले आहे. तर काही यूजर्संनी उदित नारायण यांना टोला लगावत ‘लव करावं वाटतंय गं आता म्हातारपणात,’ असे म्हटले आहे. गायक आनंद शिंदे यांचे सध्या ‘लव करावं वाटतंय गं आता म्हातारपणात’ हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. उदित नारायण यांच्या लाईव्ह कार्यक्रमातील पप्पीवर अनेकांनी टीकासुद्धा केली आहे. काही यूजर्स उदित नारायण यांच्या बाजूने बोलत असून काहींनी मात्र ही घटना घडायला नको होती, असे म्हटले आहे.