‘चोली के पीछे क्या है’ गाण्यामुळे मोडले लग्नऐकावं ते नवलच!

फेब्रुवारी महिन्यात 10 दिवसांचा लग्नाचा मुहूर्त असल्याने देशभरात विवाहसोहळे पार पडत आहेत. देशभरातील वेगवेगळ्या शहरात लगीनसराई पार पडत आहे. परंतु दिल्लीत ‘चोली के पीछे क्या है…’ या एका गाण्यामुळे लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नसोहळा हा मौजमजा, हौस पूर्ण करून घेण्याचा समजला जातो. अनेक जण लग्नात मनासारखे कपडे, शूज घालतात. तर काही मित्रमंडळी मनमुराद नाचतात. काही लग्नात नवरदेवसुद्धा नाचतात. परंतु दिल्लीतील नवरदेवाला डान्स करणे चांगलेच महागात पडले. नवी दिल्लीत लग्नसोहळा पार पडणार होता. नवरी लग्न मंडपात येऊन बसली होती. तर नवरदेव आपल्या वऱहाडी मंडळीसोबत लग्नस्थळी येत होता. नवरदेवाचे मित्र डीजेवर ताल धरून नाचत होते. डीजेचा आवाज आणि मित्रांनी आग्रह केल्याने नवरदेवानेही नाचायचा सुरुवात केली. परंतु या वेळी डीजेवर ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे वाजत होते. या गाण्यावर नवरदेव नाचतोय, हे नवरीच्या वडिलांनी पाहिले. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट डीजेवाल्याला गाणे बंद करायला लावले.

डान्सवरून मंडपात वर-वधू मंडळीमध्ये रंगला वाद

नवरदेवाला कोणते संस्कार आहेत. तो कोणताही गाण्यावर डान्स कसा काय करू शकतो. लग्नाच्या पवित्र दिवशी त्याने चोली के पीछे क्या है… यासारख्या गाण्यावर नाचणे शोभा देत नाही. नवरदेवाने प्रथा, परंपरा, मूल्यांची पायमल्ली केली, असे अनेक आरोप करत वधूच्या बापाने हे लग्न मोडल्याचे जाहीर केले. वधूच्या बापाच्या या निर्णयानंतर मंडपात बराच वेळ वाद झाला. परंतु नवरीकडील मंडळी काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत दिसली नाहीत. या घटनेनेनंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नवरीचे वडील एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी हे लग्न आता होऊ शकत नाही, असे सांगितले. नवरीच्या वडिलांचा हा निर्णय ऐकूण नवरदेवाच्या मंडळीला प्रचंड धक्का बसला. त्यांनी लग्न का मोडताय अशी विचारणा केली परंतु वधूकडील मंडळींनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. आम्ही आमची मुलगी अशा घरात देवू शकत नाही. ज्यांना अजिबात संस्कार नाहीत. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही असे सांगून टाकले. त्यामुळे नाईलाजाने नवरदेवाला नवरीविना माघारी जावे लागले.