कुंभमेळाच्या वेळी गंगेत मृतदेह फेकले, पाणी दूषित झालं; खासदार जया बच्चन यांचा गंभीर आरोप

कुंभमेळाच्या वेळी गंगेत मृतदेह फेकले गेले असा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केला. त्याचे सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक दूषित पाणी हे कुंभमेळ्यातले आहे असेही जया बच्चन म्हणाल्या.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, संसदेत आम्ही दूषित पाण्याबद्दल मुद्दा मांडला. आज सर्वाधिक दुषित पाणी कुठे मिळतंय माहितीये? कुंभमेळ्यात. याबद्दल कुणीच बोलत नाही असे जया बच्चन म्हणाल्या. तसेच कुंभमेळा सुरू असताना गंगेग मृतदेह फेकले गेले असेही बच्चन यांनी सांगितले.

कुंभमेळ्यात व्हीआयपी लोक येतात आणि स्नान करून जातात. पण गरीब आणि सर्वसामान्य लोकांना कुंभमेळ्यात त्रास होतोय, त्यांना कुठल्याच सुविधा मिळत नाहीत असेही जया बच्चन म्हणाल्या. कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले असा दावा केला जातो पण हा दावा चुकीचा आहे. नेमकं किती लोकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली याची आकडेवारी समोर आली पाहिजे अशी मागणीही जया बच्चन यांनी यावेळी केली.