मेक इन इंडिया ही योजना सपशेल अपयशी ठरली अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत पाच महिन्यांतच लाखो मतदार वाढले असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की राष्ट्रपती यांच्या अभिभाषणात काहीच नवीन नव्हते. त्यांच्या भाषणात बेरोजगारीबद्दल काहीच उल्लेख केला नहाी. तसेच पंतप्रधान मेक इन इंडियाबद्दल बोलततात. ही कल्पना चांगली होती, पंतप्रधान मोदींनी प्रयत्नही केले पण ही योजना सपशेल अपयशी ठरली.
देशात उत्पादनात 60 वर्षांपेक्षा घट झाली आहे असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आपला फोन दाखवत सांगितले की, हे फोन हिंदुस्थानात बनतात, पण याचे पार्ट चीनमधून आयात होतात आणि हिंदुस्थानात फक्त असेंबल होतात. आपण फक्त वस्तू वापरण्यावर भर दिला त्यामुळे समाजात असमानता वाढली असेही राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यांपूर्वी 70 लाख मतदार वाढले असे राहुल गांधी म्हणाले. शिर्डीतील एका इमारतीत 7 हजार मतदार वाढले, मतदार यादीत काहीतरी घोळ आहे, राज्यात पाच महिन्यातच लाखो मतदार वाढले असे म्हणत त्यांनी राज्याच्या निवडणुकी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.
LIVE: Motion of Thanks | 18th Lok Sabha https://t.co/yWrhgF2okw
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 3, 2025