Jammu-Kashmir – कुलगाममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, माजी सैनिकासह पत्नी आणि मुलगी जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात माजी सैनिकाच्या घरावर दहशवताद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी सैनिकासह त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजूर अहमद वागे असे जखमी माजी सैनिकाचे नाव आहे.

माजी सैनिकावरील हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी माजी सैनिकाला गोळी लागली असून त्यांच्यावर डॉक्टरांची विशेष टीम इलाज करत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.