वांद्रे टर्मिनस येथे ट्रेनमध्ये हमालाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे जीआरपीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हमालाला अटक केली आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मुलासह शनिवारी रात्री ट्रेनने वांद्रे टर्मिनसवर पोहचले. यानंतर ते दोघेही प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रेनमध्ये चढले. या ट्रेनमध्ये कुणीच नव्हते.
ट्रेनमध्ये आधीच उपस्थित असलेल्या हमालाने संधी साधून महिलेवर बलात्कार केला आणि पळून गेला. यानंतर महिलेने वांद्रे जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. महिला दुसऱ्या ट्रेनमध्ये का चढली? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.