छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फर्नांडो जेरोनिमो संतोस डिल्व्हा नावाच्या एका ब्राझिलच्या नागरिकाला हवाई गुप्तचर विभागाने ड्रग्जची तस्करी करताना पकडले. त्यानंतर त्याने पोटातून आणलेले 170 कॅप्सूलमधील एक किलो 649 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत साडेसोळा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठवडय़ात फर्नांडो हा पॅरिसहून मुंबईत आला होता. त्याने त्याच्या पोटात कॅप्सूल लपवून त्यातून ड्रग्ज आणल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत त्याच्या पोटातून डॉक्टरांनी 170 कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यात एक किलो 649 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज सापडले.