बाबा रामदेव यांच्याविरोधात वॉरंट

गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. न्यायालयांमध्ये पतंजलिच्या उत्पादनांसंदर्भात खटले दाखल करण्यात आले असतानाच केरळमघील एका न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावल्याचे समोर आले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरोधात दाखल फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दोघेही गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने दोघांविरोधात 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश देत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.