जर तुम्ही जबरदस्त रॅम आणि पॉवरफुल कॅमेरा असलेला 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या Infinix Note 40X 5G फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाल्यापासून सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 108MP कॅमेरा आहे आणि व्हर्च्युअल रॅम फीचर्सच्या मदतीने, रॅम 24GB पर्यंत वाढते. हेवी रॅम आणि पॉवरफुल कॅमेरा याशिवाय फोन दिसायलाही चांगला आहे.
हिंदुस्थानात लॉन्च होताना Infinix Note 40X 5G ची किंमत 8GB+256GB व्हेरियंटसाठी 14,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटसाठी रुपये 15,999 होती. सध्या फोनचा टॉप 12GB + 256GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट ॲपनुसार, बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन 2,000 रुपयांची सूट मिळू शकता. बँकेच्या ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यास फोनची प्रभावी किंमत 11,999 रुपये असेल. फ्लिपकार्ट फोनवर एक्सचेंज बोनस देखील देत आहे, ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.
हा फोन ड्युअल सिम (नॅनो) सपोर्टसह येतो. यात 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट आणि 500 निट्स पीक ब्राइटनेससह 6.78-इंच फुल-एचडी+ (1080×2436 पिक्सेल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये 256GB UFS 2.2 स्टोरेज आणि 12GB पर्यंत LPDDR4X RAM सह MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट आहे. व्हर्च्युअल रॅम फीचरद्वारे यूजर्स फोनची मेमरी 12GB RAM वरून 24GB RAM पर्यंत वाढवू शकतात.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये क्वाड-एलईडी फ्लॅशसह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोन फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो आणि NFC ला देखील सपोर्ट करतो.