योगायोगः पत्नीची बदली झाली त्याच जागी पती रुजू

देशात अनेक आयएएस-आयपीएस अधिकारी पती-पत्नीही आहेत, मात्र पत्नीची एखाद्या जिह्यातून बदली झाली आणि अन् तिच्या जागेवर नवऱ्याची पोस्टिंग झाली, असे क्वचितच घडले असेल. राजस्थानमध्ये असा अनोखा योगायोग पाहायला मिळाला. रंजिता शर्मा आणि सागर राणा असे या पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही आयपीएस अधिकारी आहेत. दौसा जिह्याच्या एसपी रंजिता शर्मा यांची पोलीस मुख्यालयात बदली झाली, तर त्यांच्या जागी सागर राणा यांना दौसाचे नवीन एसपी नियुक्त करण्यात आले.

रंजिता शर्मा आणि त्यांचे पती सागर राणा दोघेही 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हरयाणातील रेवाडी येथील रहिवासी असलेल्या रंजिता यांनी पाच वेळा अपयश आल्यानंतर 2018 साली परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सागर राणा सिव्हिल इंजिनीयरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. ते 2018मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले.