वीकेंडला काम करणे ही सुपरपॉवर… 90 तास कामाच्या वादात मस्क यांची उडी

काही दिवसांपूर्वी एल अॅण्ड टीचे संचालक एस. एन. सुब्रमण्यम  यांनी कर्मचाऱ्यांनी आठवडय़ाला 90 तास काम करावे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनीदेखील असाच मुद्दा उपस्थित केला. या दोघांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अशाच आशयाचे वक्तव्य आता अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी केलंय. ‘वीपेंडलाही काम करणे ही एक सुपरपॉवर आहे’ असा दावा मस्क यांनी केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वर्क लाइफ बॅलन्सची पुन्हा चर्चा सुरू झालेय.

एलॉन मस्क यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘खूप कमी नोकरदार लोक प्रत्यक्षात वीपेंडला काम करतात. जणू काही विरोध करणारी टीम दोन दिवसांसाठी मैदान सोडते! वीपेंडला काम करणे म्हणजे एक सुपरपॉवर आहे.’ मस्क यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.