अहिल्यानगर येथे आयोजित 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज महोळ याने बाजी मारली आहे. त्याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करून मानाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला आहे. पृथ्वीराज विजय झाल्यानंतर त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली.
महाराष्ट्र केसरीच्या खिताबसाठी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. या अंतिम लढतीत दोघांमध्ये अटीतटीचा सामना झाला. मात्र शेवटच्या क्षणी पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावले.