Maharashtra Kesari त वेगळीच कुस्ती, पराभूत कुस्तीपटूने पंचांना मारली लाथ; स्पर्धेला गालबोट

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगरमध्ये राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा झाला आहे. येथे उपांत्य फेरीत बाद झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात तो पंचांना लाथ मारताना दिसत आहेत.

मिळाली माहितीनुसार, अहिल्यानगरमध्ये तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धे आयोजित करण्यात आली आहे. यातच आज गादी विभागातील अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात रंगला. अटीतटीच्या या सामन्यात मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आल्याने पंचांनी राक्षेला बाद घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केलं. आपली पाठ टेकलीच नाही, असं यावेळी शिवराज राक्षे म्हणाला. मात्र यानंतरही निर्णय बदलला नाही. यातच रागाच्याभरात राक्षेने पंचांना लाथ मारली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याच्या कृत्यामुळे स्पर्धेला गालबोट लागल्याचं कुस्ती चाहते म्हणत आहेत.