राजस्थान येथून गोव्याच्या दिशेने काचेचे सामान घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथे अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकास किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथून गोव्याच्या दिशेने काचेचे सामना घेऊन जाणारा मालवाहू ट्रक हळवल तिठा येते आला असता ट्रक समोर प्राणी आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन कोसळला. या अपघातात ट्रक चालकास किरकोळ दुखापत झाली असून क्लीनर बचावला आहे. याच ठिकाणी मागील काही महिन्यांमध्ये वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे हे वळण धोकादायक झाले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.