वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्कि जिनेयिम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.
श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार (VIP Gate), सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 स्वयंसेवकानी परिश्रम घेतले असून, सदरची सजावट पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे.