प्रतिबंध, वेळेत निदानानेच कर्करोगावर मात, डॉ. अनिल डिक्रुझ यांचे प्रतिपादन

प्रतिबंध आणि वेळेत निदान हीच कर्करोगाविरुद्धची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत, असे मत कर्करोगतज्ञ अनिल डिक्रुझ यांनी व्यक्त केले.

‘जागेगा भारत तो बचेगा भारत’ अभियानाचा संकल्प या  परिसंवादात डॉ. डिक्रुझ यांनी हे मत व्यक्त केले.  या परिसंवादात प्रख्यात वैद्यकीय तज्ञ, पर्यावरणप्रेमी, धोरणकर्ते आणि 2,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अंबागोपाल फाऊंडेशनतर्फे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

तंबाखूचे सेवन तातडीने थांबवा

तंबाखू सेवनामुळे 40 टक्के लोकांना कर्करोग झाला आहे. लोकांना धूम्रपान आणि तंबाखू चघळणे त्वरित बंद करण्याचे आवाहन डॉ. डिक्रुझ यांनी केले.अगदी थोडेसे मद्यपानही सुरक्षित नाही, असे त्यांनी सांगितले.

पारंपरिक आहारच घ्या

कर्करोगाला रोखण्यासाठी बाजरी, डाळी आणि ताज्या भाज्यांवर आधारित पारंपरिक आहार घेण्याचा सल्ला नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते डॉ. सुभाष पाळेकर दिला.

पंचमहाभूतांचे संरक्षण करा

 मुंबईसारख्या शहरांमध्ये शहरीकरण आणि औद्योगिक कचऱ्यामुळे जलस्रोत नासाडीला लागले आहेत त्यामुळे कर्करोगासह अनेक आजार वाढत आहेत. पंचमहाभूतांचे संरक्षण हेच निरोगी जीवनाचे गमक आहे, असे जलतज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग यांनी ठामपणे सांगितले.