माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातून शनिवारी भव्य रथशोभायात्रा काढण्यात आली. प्रभादेवी आणि दादर परिसरातून निघालेल्या या रथयात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमला.