सीईटी कक्षाच्या अटल उपक्रमाला अल्प प्रतिसाद

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱयांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी याकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने 16 जानेवारीपासून ‘सीईटी-अटल’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसाठी या प्रणालीमध्ये सराव चाचण्या आणि सायकोमेट्रिक चाचण्यांचा समावेश आहे. सराव चाचण्यांमुळे प्रत्यक्ष परीक्षेचे वातावरण तयार होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपातील प्रश्नांना सामोरे जावे लागेल याची माहिती होईल. मात्र ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.