मुंबईत 5 आणि 6 फेब्रुवारीला 30 तास पाणीपुरवठा बंद! माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडुपमधील नागरिकांना फटका

मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत 30 तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडुपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 1800 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पालिकेच्या एस, एल, के पूर्व, एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • बुधवार 5 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते गुरुवार 6 फेब्रुवार रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, एकूण 30 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
  • एस विभाग – भांडुप (पश्चिम) – श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर, नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर, सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी, टेंभीपाडा, रमाबाई नगर.
  • एल विभाग – कुर्ला दक्षिण – काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मिल मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफूर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग.
  • कुर्ला उत्तर – 90 फीट रोड, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्य नगर पाईपलाईन.
  • जी उत्तर विभाग – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मिल मार्ग, माहीम फाटक, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, 60 फीट मार्ग, 90 फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम.पी. नगर धोरवडा, एम.जी. मार्ग.
  • एच पूर्व विभाग – वांद्रे टर्मिनस, ए.के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेर नगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व).
  • के पूर्व विभाग – अंधेरी, विजय नगर, मरोळ, मिलिट्री मार्ग, सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र). आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ – मुलगाव डोंगरी, एमआयडीसी, काsंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज, चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, विमानतळ मार्ग क्षेत्र, मरोळ एमआयडीसी, जे.बी. नगर, बामणवाडा, पारसीवाडा, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अॅन्ड टी. वसाहत.

पालिकेचे आवाहन

पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.