राष्ट्रपती भवनात एक विवाह सोहळा पार पडणार आहे. देशाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडत आहे. याआधी राष्ट्रपती भवनात केवळ राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच शहनाईचा आवाज गुंजणार आहे. लग्न होणाऱ्या सीआरपीएफ अधिकारी महिलेचे नाव पूनम गुप्ता आहे. पूनम सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. या लग्नसोहळ्याबद्दल राष्ट्रपती भवनाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. प्रोटोकॉलमुळे पूनम व तिच्या कुंटुंबीयांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
कधी आहे लग्न?
पूनम गुता आणि अवनीश कुमार यांचा विवाह सोहळा 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनम हिच्या मवाळ वागण्याने, मधुर बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठsने खूपच प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे लग्न होणार असल्याचे कळताच मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राऊन का@म्प्लेक्स येथे त्यांच्या लग्न सोहळ्याला परवानगी देत. मुर्मू यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.
जम्मू–कश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट अवनीश पुमारसोबत पूनम लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही पुटुंबातील जवळचे लोकच उपस्थित राहणार आहेत. पूनमचे वडील हे शिक्षक आहेत.
कोण आहे पूनम गुप्ता?
सहायक कमांडंट असलेली पूनम गुप्ता हिने 2024 मधील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केलेले आहे. पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून इंग्रजी साहित्यात मास्टर्स केलेले आहे. पूनमने ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बी.एड.ही पूर्ण केले आहे. ती जवाहर नवोदय विद्यालय श्योपूरची माजी विद्यार्थिनी आहे. यूपीएससी उत्तीर्ण करून ती सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट बनली आहे.