चीन ग्लोबल शस्त्र बाजारात आपला दबदबा कायम कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनने एक हायपरसोनिक मिसाईल बनवल्यानंतर आता एक हायपरसोनिक विमान बनवण्याचे ठरवले आहे. चीनच्या या कामगिरीला यश आले तर संपूर्ण पृथ्वीचे चक्कर केवळ 7 तासांत पूर्ण करता येऊ शकते. हे हायपरसोनिक विमान बीझिंगची पंपनी लिंगकाsंग तियानक्सिंग टेक्नोलॉजी बनवत आहे.
कंपनीने युनक्सिंग प्रोटोटाइप एअरक्राफ्टची यशस्वी चाचणीसुद्धा पूर्ण केली आहे. हे एक कमर्शियल एअरक्राफ्ट आहे. जे मॅक 4 (ध्वनीच्या वेगापेक्षा चार पट अधिक) वेगाने उडू शकते. याला 2027 पर्यंत लाँच केले जाऊ शकते. चीन सध्या या प्रोजेक्टवर जोरात काम करत आहे. हायपरसोनिक विमानाचा वेग जवळपास 5 हजार किलोमीटर प्रति तास इतका असेल. काही मीडिया रिपोर्टस्च्या दाव्यानुसार, चीनचे हे हायपरसोनिक विमान लंडन ते न्यूयॉर्प अंतर केवळ दीड तासात पूर्ण करेल.