इराणमध्ये गेलेले तीन हिंदुस्थानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. या तीन जणांमध्ये नांदेडच्या एका तरुण शेतकऱ्याचा समावेश आहे. योगेश पांचाळ असे या तरुणाचे नाव असून तो 33 वर्षांचा आहे. योगेशचा हा पहिलाच विदेश दौरा होता. धंद्यानिमित्त तो 5 डिसेंबरला मुंबईहून तेहरानला गेला होता. तीन दिवसांपर्यंत तो पत्नी आणि पुटुंबाच्या संपका&त होता. परंतु अचानक गायब झाला. विदेश मंत्रालयाने शुक्रवारी पांचाळसह तीन हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांना दिली. योगेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबरला योगेशसोबत अखेरचे बोलणे झाले होते. कोणत्या तरी गर्दीच्या ठिकाणी असल्याचे जाणवत होते. लवकरच कॉल करतो, असे म्हणाले. परंतु त्यांचा का@ल आला नाही. 9 डिसेंबरपासून फोन बंद येत आहे. 11 डिसेंबरला रिटर्न तिकीट होते.
योगेश पांचाळ शिवाय, अन्य दोन जण इराणमधून बेपत्ता आहेत. यात मोहम्मद सदीक आणि सुमीत सूद हे इराणला गेले होते. हे दोघेही बेपत्ता असून त्यांचा कोणताही संपर्प होऊ शकला नाही.