चीनच्या डिपसीक एआयने अनेकांची झोप उडवली असताना आता सौदी अरबनेसुद्धा आपला एआय चॅटबॉट रियान लाँच केलाय. हा एआय केवळ ग्लोबल लेबर मार्पेटसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. रियाद येथील पंपनी तकमोलने हा एआय लाँच केला आहे.
गुगल फोटोजमध्ये नवीन फिचर अपडेट
गुगलने आपल्या फोटोज अॅपमध्ये नवीन इमेज फ्लिप फिचर जोडले आहे. यामुळे आता युजर्सला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने आपल्या फोटोला मिरर करता येईल. हे फिचर खास सेल्फीसाठी उपयोगी येईल. कारण, सेल्फीच्या फोटोत बऱ्याचदा फोटो उलटे दिसतात.
हिंदुस्थानात अॅपलचे 4 स्टोअर उघडणार
हिंदुस्थानात आयफोनची व्रेझ वाढली असून खरेदीला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अॅपल पंपनी देशात आणखी चार नवीन अॅपल स्टोअर उघडणार आहे. अॅपलचे सीईओ टीम पुक यांनी ही घोषणा केली आहे. देशात याआधी मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीतील साकेत येथे अॅपल स्टोअर आहे. हे दोन स्टोअर उघडल्यास ही संख्या सहा वर जाईल.
‘नथिंग फोन 3’वरून 4 मार्चला पडदा हटणार
‘नथिंग फोन 3’ मार्च महिन्यात लाँच केला जाणार आहे. पंपनीने फोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. पंपनीने फोनचे अनेक टीझर आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 4 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता फोनला लाँच केले जाणार आहे. या फोनची किंमत 40 हजार रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंपनीने या फोनच्या डिझाईनची झलक दाखवली आहे.
रेल्वेतून 3 लाख टॉवेल चोरीला
रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांत प्रवास करताना प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या टॉवेल आणि बेडशीटच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 लाख छोटे टॉवेल आणि 18 हजार बेडशीट चोरीला गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याचसोबत रेल्वेमधून 2 हजार 796 ब्लँकेट 19,767 उशांचे कव्हरही चोरीला गेले आहेत. रेल्वेतील कोणत्याही सामानांची चोरी करताना कोणी आढळल्यास या गुह्यासाठी एक वर्षाची शिक्षा, एक हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिक्षेची तरतुद माहीत असूनही रेल्वेतील टॉवेल आणि बेडशीट चोरीला जात आहेत.