BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प केलं असून यात शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर जनसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचं अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूक न झाल्याने सध्या प्रशासक म्हणून पालिकेचं कामकाज पाहणारे आयुक्त भूषण गगराणी हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट

20 वर्षांपूर्वी तोट्यात असणारी मुंबई महानगरपालिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92 हजार कोटींवर गेल्या होत्या. मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाट्याने घटत आहेत.

न्यूज 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ष 2022 मध्ये महापालिकेची मुदत ठेव 91,690 कोटी रुपये होती, जी वर्ष 2023 मध्ये 5 हजार कोटींनी कमी होत 86410 कोटी रुपये आणि वर्ष 2024 मध्ये कमी होऊन 81 हजार कोटी रुपये झाली आहे. याशिवाय पालिकेने मुंबईत 500 स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांवरील प्रॉपर्टी टॅक्स माफ केल्याने प्रत्येक वर्षी 4500 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे