Budget 2025 – गोळीबाराच्या जखमेवर Band-Aid चा उपाय; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याने विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. गोळीबाराच्या जखमेवर फक्त पट्टी बांधण्याचा ( Band-Aid लावण्याचा) हा प्रकार असल्याची टीकी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.

सध्या जागतिक अस्थिरता आहे. अनेक देशांवर मंदीचे सावट आहे. जागतिक अर्थव्यवस्थाही अस्थिर आहे. अशा काळात देशाला आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी योग्य बदल आणि उपाययोजनांची गरज होती. मात्र, या अर्थसंकल्पात असे काहीही दिसून येत नाही. याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, या अर्थसंकल्पाने गोळीबाराच्या जखमेवर फक्त पट्टी बांधली आहे. जागतिक अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळात देशासमोरील आर्थिक संकटे रोखण्यासाठी योग्य बदलांची, योग्य दिशेची आणि उपाययोजनांची गरज आहे. मात्र, या अर्थसंकल्पातून सरकारची योजनांची दिवाळखोरी दिसून येत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.