Budget 2025 अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्याबाबत देशभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून सर्वसामान्यांना काहीही मिळालेले नाही. तसेच विरोधी पक्षांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ज्यांना प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे योग्य नियोजन करता येत नाही, ते अर्थसंकल्प काय सादर करणार? असा जबरदस्त टोला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, हा अर्थसंकल्प फक्त आवड्यांचा खेळ आहे. आपण या आकड्यांचे काय करणार? आपल्या विकसित देशात जनता आपले प्राण गमावत आहेत. जे सरकार महाकुंभाचे योग्य नियोजन करू शकले नाहीत,ते मृतांची योग्य आकडेवारीही देऊ शकले नाही…ते अर्थसंकल्प कसा सादर करणार? त्यांच्या अर्थसंकल्पातील सर्व आकडे खोटे आणि फसवे आहेत. अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा आमच्यासाठी मृतांची संख्या जास्त महत्त्वाची आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले.
अर्थसंकल्प आणि महाकुंभ दुर्घटनेवरून अखिलेश यादव योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जे सरकार महाकुंभ मेळ्याचे योग्य नियोजन करू शकले नाही, ते अर्थसंकल्प कसा सादर करणार? तसेच ते विकसित भारत कसा निर्माण करणारल. त्यांच्या अर्थसंकल्पातील सर्व आकडे खोटे आहेत. बजेटच्या आकड्यांचे आपण काय करणार? कुंभमेळ्यासाठी किती निधी खर्च झाला याची काहीही माहिती नाही.
ते म्हणत होते की डिजिटल महाकुंभ होईल. डिजिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. तुम्ही आकाशात ड्रोन उडवण्याबद्दल बोललात. मात्र, प्रत्यक्षात काय झाले, कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. अनेक हिंदूंनी आपले प्राण गमावले आहेत. सरकार जाहीरातबाजीत गुतंले होते पण योग्य व्यवस्था आणि नियोजन करण्यात ते अपयशी ठरले. संत आणि ऋषींनी शाही स्नान करण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. शंकराचार्य म्हणत आहेत की मुख्यमंत्री खोटे बोलतात. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही होत आहे, असेही त्यांनी सांगितले.