Budget 2025 – हा देशाचा अर्थसंकल्प आहे की फक्त बिहारचा? जयराम रमेश यांचा जबरदस्त टोला

संसदेत शनिवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी अर्थंसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच देशासमोरील प्रमुख समस्या सोडवण्यासाठीही अर्थसंकल्पात ठेस उपाययोजना नाहीत. त्याचप्रमाणे वाढती महागाई रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. या अर्थंसंकल्पात बिहारसाठी आश्वासनांची खैरात आणि बिहारला घबाड देण्यात आले आहे. मात्र, NDA तील प्रमुख घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, यावरही काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी टीका केली आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवत अर्थसंकल्पात बिहारसाठी योजनांची खैरात करण्यात आली आहे. तसेच बिहारला घबाड देण्यात आले आहे. मात्र, एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा अर्थंसंकल्प निवडणूककेंद्रीत असल्याचे दिसून येत आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

बिहारमध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. तसेच नीतीशकुमार यांच्या भूमिकेमुळे केंद्रात भाजपचे टेन्शन नेहमीच वाढत असते. तसेच तेथील निवडणुकाही जवळ आहेत. या सगळ्यांचा विचार करत अर्थसंकल्पात बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. मात्र, इतर राज्ये आणि आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सीतारमण यांच्या 78 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारला घबाड मिळाले. मात्र, आंध्र प्रदेशला मुद्दामहून दुर्लक्षित करण्यात आले आहे.

बिहारमधील सत्ताधारी जनता दल (युनायटेड) आणि आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पक्ष एनडीएचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. बिहारसाठी अर्थंसंकल्पात घबाड मिळणे स्वाभाविक आहे, कारण तेथे निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये कोणत्याही राजकीय घडामोडी नसल्याने आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे रमेश म्हणाले.

सर्वसामान्यांची उत्पन्नवाढ, देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजनांचा अभाव, खाजगी गुंतवणुकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी योजनांचा अभाव आणि किटकट अशी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) प्रणालीची रचना यावरही रमेश यांनी टीका केली. या सर्व महत्त्वांच्या बाबींकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाले आहे. फक्त करदात्यांना काही प्रमाणा दिलासा मिळाला आहे, असेही ते म्हणाले.

बिहारला देण्यात आलेल्या घबाडाबाबत ते म्हणाले की, मला समजले नाही… हा भारत सरकारचा अर्थसंकल्प होता की बिहार सरकारचा? केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संपूर्ण भाषणात तुम्ही दुसऱ्या राज्याचे नाव ऐकले का? असा सवाल करत रमेश यांनी अर्थसंकल्पाबाबत जबरदस्त टोला लगावला. तसेच जुलैमध्ये सादर झालेल्या याआधीच्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना भरभरून देण्यात आले होते. आता फक्त बिहारकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष का, असा सवालही त्यांनी केला.