बॉलीवूड चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचची शिकार होणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी नवीन नाही. कास्टिंग काऊच विरोधात आजपर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी मौन सौडलं. अशातच आता बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही तिचा अनुभव शेअर केला आहे. प्रियंकाने अनेकदा तिच्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल भाष्य़ केलं आहे. आता प्रियंकाने करियरच्या सुरुवातीच्या दिवसातील तिचा कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव शेअर केला आहे.
प्रियंका चोप्राने फोर्ब्स पावर वीमेन समिटमध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर भाष्य केलं. यावेळी तिने स्वत: काही अनुभव शेअर केले. यावेळी प्रियंका म्हणाली की, ती 19 वर्षांची असताना एका दिग्दर्शकाने तिच्याबद्दल अश्लील भाषेत भाष्य केलं होतं. या घटनेमुळे आपल्याला मानसिक त्रास झाला होता. एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान प्रियंकासोबत ही घटना घडली होती. प्रियंकाचा हा अनुभव ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
मी 19 वर्षांची असताना मला अपमानजनक घटनेला सामोरं जावं लागलं होतं. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, तिने दिग्दर्शकाला तिच्या स्टायलिस्टशी कपड्यांबद्दल बोलण्यास सांगितलं. मात्र, तेव्हा दिग्दर्शकाने खूप विचित्र पद्धतीने माझ्या स्टायलिस्टसोबत संवाद साधला होता. ‘ती जेव्हा तिची अंडरवेअर दाखवेल, तेव्हाच लोक तिला पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील. कपडे इतके लहान असायला हवेत की अंडरवेअर दिसेल’, असं दिग्दर्शकाने माझ्या स्टायलिशला फोनवर बोलताना सांगितलं. एकदा नाही अनेकदा त्याने या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यामुळे हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. मी त्या रात्र घरी गेली आणि माझ्या आईला हे सगळं सांगितलं, असं प्रियंका म्हणाली.