Budget 2025 – मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. इतकंच नाही तर ज्या करदात्यांना कर भरता आला नाही त्यांना चार वर्षांची मुदतही वाढवून देण्यात आली आहेत.

दुसरीकडे अर्थमंत्री सीतारमण यांनी टीडीएस संदर्भात मोठी घोषणा केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्नच्या आणि टीडीएसच्या मर्यादेत 10 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील कराची मर्यादा आधी 50 हजार होती ती वाढवून एक लाख रुपये करण्यात आली आहे.