मंथन – बँकिंग क्षेत्रात `एआय’ क्रांती

>>  महेश यादव

`एआय’ तंत्रज्ञानयुक्त मशीन माणसाला कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करते. याप्रमाणे निर्णय घ्यायचा की नाही या निष्कर्षाप्रत मनुष्य पोहोचतो. एआय आधारित चॅटबोटचा वापर केल्याने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा मिळत राहील आणि प्रभावीपणे समस्यांचा निपटारा होईल, अशी योजना आता बँकिंगविश्वातही अवतरत आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, पूर्वी कर्ज देण्याचे काम बँक अधिकारी आणि सहायकाच्या मदतीने केले जात होते. आता यासाठी अल्गोरिदम विकसित केले आहे आणि ते वेळ व प्रासंगिकतेच्या आधारावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊ शकतील. यात मानवी भावनांना जागा नसते आणि म्हणून तेथे गैरप्रकार, पक्षपात होण्याची शक्यता राहात नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) प्रस्थ हे बँकिंग क्षेत्रासह जगातील सर्वच क्षेत्रांत वेगाने वाढत आहे. म्हणूनच व्यावसायिक निर्णय घेण्यात बँका अन्य क्षेत्रांच्या तुलनेत आघाडी घेताना दिसून येतात. आज बँकांत बहुतांश आर्थिक आणि बिगर आर्थिक सेवा एआयच्या मदतीने पूर्ण होत आहेत. यात खात्यातील व्यवहाराची तपासणी, स्टेटमेंट, पासबुक प्रिंटिंग, खाते सुरू करणे, पैसे भरणे आणि काढणे, कर्जाची पात्रता, ताळेबंद, एनपीए खात्याचे विवरण आदींचा समावेश आहे.

एआययुक्त मशीन कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे आकलन करते आणि नंतर कोणता उपाय चांगला ठरेल यासंदर्भात माणसाला सल्ला देते. शेवटी ग्राहक एआयच्या मदतीने समस्या निकाली काढतात. बँकेच्या मते, एआय आधारित चॅटबोटचा वापर केल्यास ग्राहकांना अधिक परिणामकारक सेवा उपलब्ध करून देता येईल. चॅटबोटच्या माध्यमातून बँका ग्राहकांच्या समस्या आणि पारींचा वेगाने निपटारा करण्यात सक्षम राहू शकतात. वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस, कर्ज अंडररायटिंग, कस्टमर अनॅलिटिक्स, गैरव्यवहाराचा मागोवा आणि बँकिंग सेवेशी संबंधित अन्य प्रकरणे मार्गी लावण्यात चॅटबोट महत्त्वाची भूमिका बजावतात. बँकिंग प्रणालीच्या कक्षेत एखादा गैरव्यवहार होत असेल तर त्याचा शोध लावणे सोपे नसते. परंतु एआययुक्त मशीन बनावट व्यवहारांना सहजपणे पकडू शकते. त्याच्या मदतीने फसवणुकीची प्रािढया कधी आणि कोठे सुरू झाली  याचा थांगपत्ता लागू शकतो. शिवाय सुरक्षित व्यवहार प्रदान करण्याचे कामदेखील एआय करते. या माध्यमातून व्यापक प्रकरणातील आकडेवारीचे विश्लेषण करता येते.

आजघडीला देशात सुमारे 114 कोटीपेक्षा अधिक नागरिक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. स्मार्टफोनची संख्या वाढल्याने बँकिंग क्षेत्रात एआयचा वापरदेखील वाढला आहे. सध्याचे स्मार्टफोन एआय फीचरयुक्त आहेत. आजघडीला स्टेट बँकेच्या सर्वच खातेदारांच्या स्मार्टफोनमध्ये योनो अ‍ॅप

इन्स्टॉल आहे. यात पैसे काढणे, पैशाचे व्यवहार, बिल भरणे आदी सुविधा आहेत. भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी एआय पॉवर चॅट असिस्टंट फीचर सुरू केले. याला एसबीआय इंटेलिजन्स असिस्टंट किंवा एसआयए असेही म्हटले जाते. तो ग्राहकांना बँकिग व्यवहारात मदत करेल. शिवाय फसवणूक रोखणे आणि त्याचा शोध घेणे, आकड्यांचे विवरण करणे, कर्जाचे व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीही मदत करतो. `एसआयए’मुळे ग्राहक सेवेत सुधारणा झाली आहे. दुसरीकडे बँकांच्या खर्चात घट होत आहे आणि विविध योजना व सेवेशी संबंधित समस्यांचेदेखील तातडीने निराकरण होत आहे. बँकांच्या अनेक कामांत रोबोचादेखील वापर होत आहे. बँकेत ग्राहकांचे स्वागत करणे, योग्य काऊंटरवर घेऊन जाणे, ग्राहकांना क्रेडिट कार्ड, गृहकर्ज यासारख्या गोष्टींची माहिती देण्याचे काम रोबो करत आहे. पारंपरिक रूपातून आर्थिक जगात तज्ञांना विशेष महत्त्व राहिलेले आहे. हे तज्ञ गुंतवणूक, बचत आदीसंदर्भात सल्ला देतात. पण या क्षेत्रात स्टार्टअप आणि मोठमोठय़ा कंपन्या आल्याने मानवी हस्तक्षेप कमी होत एआययुक्त मशीनचा वापर वाढत आहे. म्हणून एआय मशीन हे एखाद्या अर्थतज्ञाप्रमाणे काम करत आहेत.

एआययुक्त मशीन हे आर्थिक संस्थांना अनेक प्रकाराने मदत करतील. उदा. फसवणुकीची शक्यता कमी करतील आणि गुंतवणूक तसेच कर्जाची परतफेड किंवा चांगला परतावा मिळवण्यासंदर्भातील शक्यता वाढविण्याचे काम करेल. एआययुक्त मशीन कामे मार्गी लावण्याच्या प्राक्रियेत वेग आणत आहेत. ग्राहक सेवा चांगली होत आहे. आकडेवारीचे विश्लेषण करणे सुलभ झाले आहे. पूर्वी याप्रकारची आकडेवारी सादर करताना बँक कर्मचाऱ्यांची दमछाक व्हायची. परिणामी ग्राहकांना सेवा वेळेत मिळत आहे. बनावट चलनाची ओळखदेखील सहजपणे केली जात आहे. सध्या अनेक एआय आधारित फंड अणि स्मार्ट बीटा फंड बाजारात असून ते गुंतवणुकीतील मनुष्याची भूमिका संपवत आहेत. त्याच वेळी सार्वजनिक निधी हा संवेदनशील बाब असल्याने तेथे एआयचा वाटा फार नाही. मशीन आधारित व्यवसायाचे ध्येय हे नियमितरूपाने चांगला परतावा देण्याचे आहे. आर्थिक क्षेत्रात बँक आणि अन्य वित्तीय संस्था, स्टार्टअप आदी एआय तंत्रज्ञानात रुची घेत आहेत. या आधारावर बँकिंग क्षेत्रात एआयचा वापर आगामी काळात आणखी वाढेल, असे म्हणता येऊ शकेल.

अल्गोरिदमचा वापर

पूर्वी कर्ज देण्याचे काम बँक अधिकारी आणि सहाय्यकाच्या मदतीने केले जात होते. आता या जागी आकड्यांवर आधारित मॉडेल्स आलेले आहेत. यासाठी अल्गोरिदम विकसित केले आहे आणि ते वेळ व प्रासंगिकतेच्या आधारावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊ शकतील. यात मानवी भावनांना जागा नसते आणि म्हणून तेथे गैरप्रकार, पक्षपात होण्याची शक्यता राहात नाही. यापूर्वी कर्जाची प्रकरणे मंजूर करताना गैरव्यवहार होत असल्याच्या पारी सातत्याने बँकेकडे येत असत. पण आता एआययुक्त प्राक्रिया अंगिकारली जात असल्याने कर्ज मंजुरी आणि नामंजुरी हे माणसाच्या हातात राहिले नाही. साहजिकच तेथे भ्रष्टाचाराला वाव राहात नाही. कर्जाच्या प्रस्तावाचे योग्य आकलन केले जाते. या प्रकारच्या अल्गोरिदमचा वापर हा बँक आणि अन्य आर्थिक संस्थांत तसेच फिनटेक स्टार्टअपमध्ये केला जात आहे.

(लेखक बँकिंग अभ्यासक आहेत.)